महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 'शिक्षण संक्रमण' वेबसाईट वर आपले स्वागत....!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरमहा 'शिक्षण संक्रमण'शैक्षणिक मासिक प्रकाशित केले जाते , हे आपणास विदित आहे. शिक्षणासाठी बदलत्या विचारप्रवाहांचे आद्ययावत ज्ञान देणारे 'शिक्षण संक्रमन' हे राज्यमंडळाचा आरसा आहे.
'शिक्षण संक्रमण' मधून अभ्यासू शिक्षक, लेखक यांचे उत्तम , वैचारिक साहित्य प्रसिध्द केले जाते. या अंकासाठी विद्यार्थी ,पालक व शिक्षकांना मुखप्रुषठासाठी चित्रे पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चित्रे त्या त्या महिन्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित असावित . उदा. दिनविशेष , नैसर्गिक बदल , ऋतू, कालमान, शाळा-विद्यार्थी यांच्याशी संबधीत , शालेय विषयाशी निगडीत किंवा उपक्रमांवर आधारित असावित . चित्रे वॉटरकलर , अॅक्रालिक कलर , ऑईल कलर इत्यादी प्रकारातील असावित . चित्रे पाठविताना ते दोन महिने आधी पाठवावित. शिक्षक , चित्रकार एकापेक्षा जास्त चित्रे पाठवू शकतात . संपादक मंडळाकडून निवड प्रक्रियेतून चित्रे निवडले जाईल. निवडलेले चित्रे 'शिक्षण संक्रमन' च्या अंकाच्या मुखपृष्ठासाठीही वापरले जाईल. चित्रकाराचे व त्यांच्या शाळेचे नाव प्रसिध्द केले जाईल.